ब्रेकींग न्यूज : कुसूंबा तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Kusumba Talathi in the net of Jalgaon ACB जळगाव (7 जानेवारी 2025) : सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी तडजोडीअंती तीन हजारांची लाच मागून स्वीकारणार्या जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील तलाठी नितीन शेषराव भोई (31) यास जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
जळगाव तालुक्यातील 26 वर्षीय यांनी त्यांच्या आई व भावाचे नाव 7/12 उतार्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. याबाबत तलाठी यांनी पाच हजार रुपये लाच 7 जानेवारी रोजी मागितली व जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवताच पडताळणी करण्यात आली. आरोपीने सुरूवातीलरा पाच हजार, चार व नंतर तडजोड करीत तीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली


यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, चालक सुरेश पाटील, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.





