माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजनांच्या अडचणी कायम : न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला


जळगाव (7 जानेवारी 2025) : जळगाव महापालिकेतील जुन्या जलवाहिनीच्या पाईप चोरी प्रकरणी माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून अद्यापही त्यांना अटक करण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. त्यातच महाजन यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज जिल्हा न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. यामुळे महाजन यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, याच प्रकरणात भावेश पाटील, कुंदन पाटील व सादीक खाटीक यांना न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. सुनील महाजन यांच्यावर दोन पोलीस स्थानकांमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून महाजन यांचा शोध सुरू असला तरी ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !