राज्यातील आठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या


मुंबई (7 जानेवारी 2025) : राज्यातील आठ वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यापूर्वी गत आठवड्यात राज्यातील 12 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या होत्या.

एन.नवीन सोना हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव असतील तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नवे आयुक्त असतील.






या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या

अतुल पाटणे : आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई यांची सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ऋचा बागला  : प्रधान सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

 

अंशु सिन्हा : प्रधान सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

एन.नवीन सोना : प्रधान सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), मंत्रालय, मुंबई यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती

 

डॉ.रामास्वामी एन.  : सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई

 

वीरेंद्र सिंह  : सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

 

प्रदीप पी. :  मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

माणिक गुरसाल  : मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून नियुक्ती

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !