फास्ट टॅगबाबत नियम बदलले : जाणून घ्या मंत्री मंडळाचा मोठा निर्णय ; 1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी


मुंबई (7 जानेवारी 2025) : आगामी 1 एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक असणार असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-2014 मध्ये सुधारणा यासाठी केली जाणार आहे.

फास्ट टॅगसंदर्भात शासन निर्णय फडणवीस सरकार जारी करेल. त्यात सर्व चारचाकी वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य असेलच पण दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसदर्भात या जीआरमध्ये काही निर्णय असेल का हेही लवकरच कळणार आहे.






राज्य मंत्रिमंडळाकडून या निर्णयांना मंजुरी

1) शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-2014 मध्ये सुधारणा करणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)

1 एप्रिल 2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य

2) महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करणार (सामान्य प्रशासन विभाग)

– शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल

– मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणे, राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती इत्यादी बाबींसंदर्भात तरतुदी

3) ई-कॅबिनेट सादरीकरण होणार, यापुढे मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस होणार, आजच्या सादरीकरणानंतर ई-कॅबिनेट धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !