बोदवड तालुक्यातील बालिकेवर अत्याचार : नराधमाला सात वर्ष शिक्षा
Torture of a girl in Bodwad taluka : Man sentenced to seven years भुसावळ (8 जानेवारी 2025) : बोदवड तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना 2 ऑगस्ट 2017 रोजी घडली होती. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भुसावळ सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. आरोपीविरोधात सबळ पुरावा सिद्ध झाल्याने त्यास सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. पुरूषोत्तम उर्फ अमोल गजानन वनारे (21, बोदवड तालुका) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एकांतपणाचा फायदा घेत अत्याचार
एका गावातील 13 वर्षीय पीडीता घरात एकटी असताना आरोपीने 2 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी दहा वाजता घरात अनधिकृतरित्या प्रवेश करीत तिच्यावर अत्याचार केला व याचवेळी कुटूंब आल्यानंतर आरोपीने धमकी व शिविगाळ करीत पळ काढला. बोदवड पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.


या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पीडीत बालिका, वैद्यकीय अधिकारी डॉ.नम्रता अच्छा, तपास अधिकारी उपनिरीक्षक बारकू झिंगा जाने यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड.संजय डी.सोनवणे यांनी प्रभावीपणे युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून शेख रफिक शेख कालू यांनी सहकार्य केले.





