भुसावळात आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

रेल्वे मैदानावरील स्पर्धांचे उद्घाटन, रेल्वे हॉस्पीटलला भेट


भुसावळ (8 जानेवारी 2025) : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत बुधवार, 8 रोजी रेल्वे मैदानावरील सिंथेटिक ट्रॅकचे (धावपट्टी) आणि हॉस्पीटल ऑन व्हील्स (रेल्वे डब्यात तयार केलेला दवाखाना) चे उद्घाटन होत आहे. राज्यपाल हे रेल्वे हॉस्पीटलला सुध्दा भेट देणार आहे.

दुपारी राज्यपाल भुसावळात
राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे बुधवार, 8 रोजी दुपारी 12.30 वाजता रेल्वेच्या खेलकुद मैदानावर येतील. रेल्वेच्या विविध कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी 12.30 ते दुपारी 1.20 वाजेपर्यत राज्यपाल यांच्याहस्ते रेल्वे स्पोर्टस ग्राऊंड येथे नवीन सिंथेटिक ट्रॅकचे उदघाटन, ट्रॅक मेनेनर्स कर्मचार्‍यांचा गौरव व हॉस्पीटल ऑन व्हीलचे उद्घाटन केला साईडींगजवळ रेल्वे स्थानकाच्या परिसरात होईल.


दुपारी 1.20 ते दुपारी 3 राखीव, दुपारी 3 वाजता रेल्वे क्रीडा मैदान येथून जळगावकडे ते रवाना होतील. डीआरएम ईति पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रेल्वेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे तयारी करीत आहे. शहरात प्रथमच राज्यपाल यांचा दौरा असल्यो चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रशासनाची रंगीत तालीम
राज्यपाल यांचा बुधवारी भुसावळ दौरा असल्याने त्याच्या दौर्‍याच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून मंगळवारीच दौर्‍यांची रंगीत तालीम घेण्यात आली. जळगाव ते भुसावळ या मार्गावर 16 गाड्यांचा ताफा होता. रेल्वे स्टेशनपर्यत हा ताफा आला होता. तेथून दुपारी 3.40 वाजता पुन्हा जळगावकडे ताफा रवाना झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !