जळगावातील महिला वकिलाची 75 लाखांची फसवणूक
जळगाव (8 जानेवारी 2025) : जळगावातील वयोवृद्ध महिला वकिलाला कंपनीची खोटी माहिती देत तब्बल 75 लाखात गंडवण्यात आले. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
जळगाव शहरातील गजानन कॉलनीतील शांतीबन अपार्टमेंटमध्ये शिरीन गुलाम अली अमरेलीवाला (65) या वृद्ध महिला आपल्या परिवारास वास्तव्याला आहेत. जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करून त्या आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्या ओळखीतले मनीष सतीश जैन याने वृध्द महिलेला कंपनीची खोटी माहिती सांगून कंपनीचे रियल इस्टेट व बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चे व्यवहारासाठी रकमेची आवश्यकता असल्याने, तुम्ही पैसे दिल्यास दीड टक्के प्रती महिन्याच्या व्याजाचा आकर्षक परतावा देईल, असे सांगून त्याने वृद्ध महिलेकडून डिसेंबर 2021 ते जानेवारी 2024 पर्यंत या कालावधीत एकुण 75 लाख रुपये घेतले.


यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या कट कारस्थानमध्ये मनीष जैन, त्याचा भाऊ अतुल सतिष जैन, त्याची आई यशोदा सतीष जैन (तिघे रा.यश प्लाझा, जळगाव), जाफरखान मजीद खान (रा.सुप्रीम कॉलनी), विजय इंदरचंद ललवानी (रा.सिंधी कॉलनी), अक्षय अग्रवाल (रा.गोलाणी मार्केट) आणि कंपनीचे सेक्रेटरी असे नाव सांगणार्या केतन किशोर काबरा (रा.जयनगर) याचा सहभाग आहे.
दरम्यान शिरीन अमरेलीवाला यांना ऑगस्ट 2024 मध्ये पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी मनीष जैन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी मनीषने त्यांना पैसे देण्यास नकार दिला तसेच त्याच्या घरातील अतुल सतीश जैन त्याची आई यशोदा सतीश जैन यांनी धमकावत पैसे मिळणार नाही, तुमच्याकडून काय करायचं आहे करून घ्या, असे सांगून धमकावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिरीन अमरेलीवाला यांनी मंगळवार, 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फसवणूक करणार्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे करीत आहे.





