सावत्र पिताच हैवान : अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर आरोपीला बेड्या


भडगाव (8 जानेवारी 2025) : सावत्र बापाने 10 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमास अटक करण्यात आली.

धमकी देत केला अत्याचार
पीडीता 10 वर्षीय चिमुकली ही आपल्या आईसह कल्याण येथे वास्तव्याला आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी पीडीत मुलगी ही आईसोबत भडगाव येथे राहत असतांना तिच्या सावत्र बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. . यावेळी पिडीत मुलीचे तोंड दाबून आरडाओरड केली तर तुझ्या आईचा मर्डर करेल अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा 18 जुलै 2024 रोजी कल्याण येथे मुलीच्या मामांच्या घरी देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यावेळी पीडीतेने आरडाओरड केल्यानंतर नराधम बाप घटनास्थळाहून पसार झाला. या घटनेप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने भडगाव पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपीला अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !