नायगावात शिक्षकाच्या बदलीनंतर विद्यार्थी संपावर

नियुक्तीपत्र नसल्याने पालकांमध्ये संताप : विद्यार्थ्यांचे नुकसान


यावल (9 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील नायगाव गावातील सातपुडा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांची बदली केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी थेट संप पुकारला आहे. शाळेत येऊन शाळेच्या प्रांगणात हे विद्यार्थी बसून आहेत. बुधवारी संस्था चालकांच्या आदेशानंतर शिक्षक हजर झाले मात्र पालक व विद्यार्थ्यांनी त्यांना नियुक्तीपत्र दाखवण्याची मागणी केल्यानंतर शिक्षकांनी केवळ तोंडी नियुक्तीवर आल्याचे सांगितल्यानंतर विद्यार्थी संपावर ठाम राहिले आहेत. जोपर्यंत शिक्षकाची बदली रद्द होत नाही व लेखी आदेश येत नाही तोपर्यंत संपाचा पावित्रा कायम राहणार आहे.

शिक्षकासाठी विद्यार्थी संपावर
नायगाव येथे सातपुडा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक एस.एस.पाटील यांची संस्थेकडून बदली करण्यात आली. त्यांची बदली झाल्यामुळे या शाळेतील इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी थेट संप पुकारला. सोमवारपासून विद्यार्थी शाळेच्या आवारात बसून राहिले आणि आत वर्गात प्रवेश केलाच नाही. जोपर्यंत शिक्षक एस.एस.पाटील यांची झालेली बदली रद्द केली जात नाही. तोपर्यंत आम्ही शाळेत शिक्षण घेणार नाही. अशी भूमिका विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी घेतली. गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी शाळेला भेट देत समजूत काढली मात्र विद्यार्थी मागणीवर ठाम राहिले. बुधवारी शिक्षक शाळेत आले मात्र त्यांना तोंडी आदेशान्वये पाठवण्यात आल्याने विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले. संस्था चालक आता बदलीबाबत नेमका काय निर्णय घेतात ? याकडे लक्ष लागले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !