भुसावळात भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे सदस्य नोंदणी अभियान


भुसावळ (9 जानेवारी 2025) : शहरातील भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियानाल नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बुधवार, 8 रोजी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल रोडवरील साईजीवन समोर े भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. उद्घाटन भाजपा भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रदेश सचिव अजय भोळे, अभियान प्रमुख किरण कोलते, नगरसेवक गिरीश महाजन, भाजपा अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नागेश्वर साळवे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर, अलका शंकर शेळके यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, उपाध्यक्ष प्रेमचंद तायडे, मनोज राखुंडे, सरचिटणीस गणेश जाधव, रवींद्र दाभाडे, संतोष ठोकळ, उपाध्यक्ष गौरव वाघ, दीपक सोनवणे, नरेश खंडारे, राकेश सपकाळे, दीपक गायकवाड, दिनेश बालूरे, विकास राखुंडे, मुकेश राखुंडे, युवा मोर्चा खजिनदार मनीष सारंगधर पाटील यांनी परिश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !