अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भुसावळातील उत्कृष्ठ खेळाडू प्रथमेश ठाकूरचा मंत्र्याच्या हस्ते गौरव


भुसावळ (9 जानेवारी 2025) :  भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पातळीवर अ‍ॅथलेटिक्समध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या प्रथमेश समशेरसिंग ठाकूर या दहा वर्षीय खेळाडूचा सन्मान करण्यात आला.

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व चषक देवून त्यास गौरविण्यात आले. शंभर मीटर धावणे स्पर्धेत प्रथमेशने नेपाळ देशासह राज्यातील नाशिक, अमरावती व विविध शहरांमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. 2023-2024 मध्ये विविध स्पर्धेतही त्याने प्रथम क्रमांक व चमकदार कामगिरी केल्याने त्याचा उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत निकम, उपाध्यक्ष योगेंद्र हरणे, भाजयुमोचे गौरव आवटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.


कॉपी करू नका.