तिरुपती मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू
Six devotees die in stampede near Tirupati temple वृत्तसंस्था । नवी दिल्ली (9 जानेवारी 2025) : आंधप्रदेशातील तिरुपती बालाजींच्या दर्शनार्थ आलेल्या भाविकांमध्ये अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू ओढवला तर 40 वर भाविक जखमी झाले. वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन मिळविण्यासाठी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ही चेंगराचेंगरी झाली.
शुभ मुहूर्तावर गर्दी मात्र अनियंत्रीत गर्दीने गेले बळी
पवित्र वैकुंठ एकादशीच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविकांनी गुरुवारी सकाळी 5 वाजल्यापासून 9 काउंटर्सवर टोकन वाटप करण्यात येणार असल्याने गर्दी केली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका शाळेवरील केंद्रावर गर्दी अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरी झाली. ज्यात सहा भाविकांचा जीव गेला.
40 भाविक जखमी
या दुर्घटनेनंतर 40 जखमींपैकी 28 जणांना रुईया रुग्णालयात तर 12 जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने चार भाविकांचा रुईयामध्ये आणि दोन भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिला आणि एक पुरूषाचा समावेश आहे.
मंदिर समितीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी परिस्थितीबाबत तातडीची बैठक घेतली. तसेच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी भाविकांचा मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, वरिष्ठ अधिकार्यांना घटनास्थळी जाऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.