ब्रेकींग न्यूज : शिरपूरातील लाचखोर वरिष्ठ तंत्रज्ञ धुळे एसीबीच्या जाळ्यात
चारशे रुपयांची लाच भोवली : धुळे एसीबीच्या कारवाईने खळबळ
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/01/dhobhi.gif)
Bribery senior technician from Shirpur caught by Dhule ACB शिरपूर (10 जानेवारी 2025) : शिरपूरातील वीज महावितरण कंपनीत वायरमन असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबी (33, प्लॉट नं.14, महाराजा अग्रसेन नगर, 80 फुटी रोड, वरवाडे, शिरपूर, मूळ रा.लोहटार, ता.पाचोरा) यास चारशे रुपयांची लाच घेताना धुळे एसीबीने कारवाई केल्यानंतर लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
35 वर्षीय तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यांच्या घराच्या वीज पुरवठ्याच्या वायरचा अडथळा होत असल्याने ही वायर दुसर्या खांबावर जोडून दिल्याचे मोबदल्यात तक्रारदाराकडे तंत्रज्ञ धोबी यांनी 550 रुपये लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने गुरुवार, 9 रोजी तक्रार नोंदवली. पडताळणीत तक्रारदाराने आरोपीने तडजोडीअंती 400 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला व लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/mantri-niwad.jpg)
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार कदम, मकरंद पाटील, प्रवीण पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.