यावल-फैजपूर रस्त्यावर वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले


यावल (11 जानेवारी 2025) : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर फैजपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर बालाजी कृषी केंद्रासमोर एका वाहनातून एक जण वाळू चोरी करून नेत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर पथक धडकले मात्र वाहन चालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी वाहन आणि वाळू असा तीन लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध वाळू पुन्हा ऐरणीवर
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर यावलकडून फैजपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर बालाजी कृषी केंद्रासमोर टाटा कंपनीच्या 407 वाहनातून एक जण वाळू चोरी करून नेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळताच त्यांनी सहायक फौजदार हेमंत सांगळे, सहायक फौजदार असलम खान, पोलीस हवालदार रोहिल गणेश, पोलीस नाईक वसीम तडवी, किशोर परदेशी या पथकाला आदेश दिले आणि या पथकाने त्या ठिकाणी जाऊन वाहन थांबवले. पोलिसांचे पथक पाहून वाहनातील चालक तिथून पसार झाला. यावल पोलिसांनी वाळू, वाहन असा तीन लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी यावल पोलिसात हवालदार अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !