भुसावळातील तरुणाचा खून 23 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येच्या बदल्यातून : सहा जणांविरोधात गुन्हा

आर.के.किताब घरासमोरील भल्या पहाटेची घटना : खुनानंतर चार हल्लेखोर पसार ः सहा महिन्यांपूर्वी संशयीतांना मिळाला होता जामीन


Murder of a young man in Bhusawal in retaliation for a murder committed 23 months ago: Crime against six people भुसावळ (11 जानेवारी 2025) : भुसावळ शहरात बदल्याच्या भावनेतून झालेल्या खुनांचा ट्रेण्ड पुन्हा उफाळून आला आहे. सुमारे 23 महिन्यांपूर्वी शरीर सौष्ठव पटू असलेल्या भावाची हत्या केल्याप्रकरणातील संशयीत आरोपीची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता भुसावळातील खडका रोडवरील अमरदीप टॉकीज जवळील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात घडली. तेहरीन नासीर शेख (27, मचछीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तेहरीन हा फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या शरीर सौष्ठव पटू अफाफ अख्तर पटेल (30, भुसावळ) या तरुणाच्या हत्येतील प्रमुख संशयीत आहे तर ही हत्या अफाकच्या परिचितातील मित्रांनी पोलिसांना संशय असून सहा जणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

चहा पित असतानाच गोळीबार
जाम मोहल्ला भागातील आर.के.किताब घरासमोरील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थ विक्री करणारा तरुण तेहरीन नासीर शेख (27, मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) हा चहा पिण्यासाठी शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास आला. यावेळी दुकानात सात ते आठ ग्राहक चहा पित होते तर तेहरीनदेखील चहा पिण्यासाठी आल्यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चार संशयीतांपैकी तिघांनी आपल्याकडील गावठी पिस्टलातून तीन गोळ्या झाडल्याने तेहरीन जागीच रक्तबंबाळ झाला. डोक्यात, मानेजवळ व पोटावर मर्मस्थळी गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होवून जागीच तेहरीन गतप्राण झाला तर अचानक झालेल्या प्रकारानंतर दुकानातील ग्राहकांमध्ये घबराट पसरून ते सैरावैरा पळाले. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर दुचाकीवरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


बाजारपेठ पोलिसांची धाव
चहाच्या दुकानात भल्या सकाळीच झालेल्या गोळीबारानंतर याच भागातून जाणार्‍या एका पोलिसाने तातडीने बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह सहकार्‍यांनी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळावर बाजारपेठ पोलिसांनी दोन गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या तसेच एक जिवंत काडतूस आढळले आहे.

जाम मोहल्ल्यातील दुकाने बंद : नागरिकांना प्रवेश बंदी
शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तरुणाचा गोळी झाडून खून झाल्याची वार्ता हवेच्या वेगात या भागात पसरताच व्यावसायीकांनी अप्रिय घटना घडण्याच्या भीतीने पटापट आपापली दुकाने बंद केली. स्टेशन रोडकडून जाम मोहल्ल्याकडे येणार्‍या रस्त्यावर पोलिसांनी दुचाकी आडव्या लावून वाहनांना बंदी केली तर खुनाच्या घटनास्थळ परिसरातही कुणालाही जावू-येवू देण्यास मनाई करण्यात आली.

मित्राच्या आठवणीत हातावर गोंदवला टॅटू : संशयीताची ओळख पटली
शरीरसौष्ठवपटू अफाक पटेलचा गतवर्षी 8 फेब्रुवारी 2023 रोजी खून झाल्यानंतर त्याच्या आठवणीत अदनान नामक मित्राने हातावर टॅटू गोंदवला होता. अदनानविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात आर्म अ‍ॅक्टचा गुन्हादेखील दाखल आहे. शुक्रवारच्या गोळीबारात पोलिसांना मिळालेल्या फुटेजमधून अदनानसह साईलची ओळख पटली असून अन्य दोघांची ओळख पोलिसांकडून पटवली जात आहे तर रात्री उशिरापर्यंत चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. मयत तेहरीन नासीर शेखचा मृतदेह ट्रामा सेंटरमधून जळगाव सिव्हीलमध्ये शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. त्याला तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !