जळगाव उड्डाणपुलाखालून दुचाकी लांबवली
जळगाव (11 जानेवारी 2025) : पार्किंग केलेली सुमारे 35 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक एम.एच.37 ए.ई.8619) चे लॉक तोडून चोरट्यांनी चोरून नेली. सोमवार, 6 रोजी रात्री 8.20 वाजेच्या सुमारास ही घटना शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली उघडकीस आली.
या प्रकरणी वाहन मालक भरत लक्ष्मण ठाकूर (30, रा. हरिओमनगर, आव्हाणा रोड) यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार किशोर निकुंभ हे करीत आहेत.







