जळगावातील व्यावसायीकाची 78 हजारांची फसवणूक


जळगाव (11 जानेवारी 2025) :सेंट्रिंग प्लायवूडचे 60 सीट विश्वासाने खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगरात टिम्बर मार्केट येथील हनुमान विजय सॉमिल येथे ही घटना घडली.

असे आहे प्रकरण
भावेश पुरुषोत्तम पटेल (38, रा.आदर्शनगर) यांची हनुमान विजय सॉमिल नावाची वखार शिवाजीनगरात आहे. आसिफभाई (पूर्ण नाव माहीत नाही, रा. विवरे) हे 28 नोव्हेंबर ते 9 जानेवारी दरम्यान या सॉमिलवर माल घेण्यासाठी आले. त्यांनी सेंट्रिंग प्लायवूडचे 60 सीट किंमत 77, 855 रुपयांचे खरेदी केले मात्र खरेदी केलेल्या मालाची रक्कम त्यांनी अदा केली नाही. विश्वासात घेऊन फसवणूक केली, अशी तक्रार भावेश पटेल यांनी दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुरुवार, 9 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार प्रफुल्ल धांडे हे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !