मनी लाँण्ड्रींगची धमकी देत जळगावातील डॉक्टरांना 32 लाखांचा गंडा
जळगाव (12 जानेवारी 2025) : तुमच्या बँक खात्यामध्ये मनी लाँड्रिंग झाली आहे. या केसमध्ये अटक केलेल्या संशयितांकडून तुम्ही 25 लाख घेतले आहेत. या गुन्ह्यात तुम्हाला अटक होईल, असा धाक दाखवित सायबर ठगांनी येथील 58 वर्षीय डॉक्टरला 31 लाख 56 हजार 64 रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी शुक्रवार, 10 रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
डॉक्टरांना घातला गंडा
58 वर्षीय डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. 31 डिसेंबर 2024 ते 9 जानेवारी 2025 दरम्यान डॉक्टरांच्या मोबाइलवर राधिका नावाच्या महिलेने फोन कॉल केला. त्यानंतर राजेश प्रधान व मुकेश बॅनर्जी यांनी डॉक्टरला मॅसेज व व्हिडिओ कॉल केला. तुमचा हा मोबाइल क्रमांक नावे रजिस्टर आहे. तुम्ही या मोबाइलवरून हरॅशमेंट व महिलेशी अश्लील व्हिडिओ पाठविले म्हणून तुमच्याविरुद्ध बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे या ठगांनी सांगितले.


डॉक्टरांना ठगांनी व्हॉट्सअपद्वारे बांद्रा पोलीस ठाण्यातील बनावट गुन्ह्याची नोटीस टाकली, जी खरीखुरी आहे असे भासविले. इन्फर्मेशन डिपार्टमेंटची नरेश गोयल विरुद्धची नोटीस कॅनरा बँकेच्या डॉक्टर यांच्या खात्यात सुमारे दोन लाख जमा झाल्याचे तसेच डॉक्टरांच्या नावे लिहिलेली आरटीजीएस पावती सीबीआयची मनी लाँड्रिंग अॅण्ड ड्रग्ज स्मगलिंग संदर्भात कॉन्सेंट टू ट्रम्स ऑफ कॉन्फीडेंशियली ग्रीमेंट, आरबीआयची नोटीस डॉक्टरांना पाठविली. म्हणजे मनी लाँड्रिंग खात्यामधून झाली असा बनाव ठगांनी केला. मनी लाँड्रिंग केसमध्ये अटकेत असलेला नरेश गोयल याने हे केले असून तुम्ही त्याच्याकडून 25 लाख रुपये घेऊन तुमचे खाते नरेश गोयल याला विकले, असे सांगत ठगांनी व्हिडिओ कॉल बंद केला. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जायचे नाही, तुम्हाला अटक करण्यात येईल. तुमची प्रतिष्ठा जाईल, असा अटक कारवाईचा ठगांनी दम भरला. त्यानंतर डॉक्टरांच्या खात्यामधून 31 लाख 56 हजार 64 रुपये ऑनलाइन स्वीकारून ठगांनी आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे करीत आहेत.





