भुसावळातील तरुणाचा बदल्याच्या भावनेतून खून : चौघा आरोपींना मनमाडमधून अटक

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : चार पिस्टलासह जिवंत काडतूस जप्त


भुसावळ (12 जानेवारी 2025) : शहरातील शरीरसौष्ठवपटू अफाक पटेलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शहरातील तेहरीन नासीर शेख (27) याची शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणी बल्लारशाह येथून सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल (32, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने बल्लारशा येथून शनिवारी अटक केली होती. यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी खुनातील चार आरोपींना मनमाड येथून बेड्या ठोकल्याची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ उपस्थित होते.

या आरोपींना अटक
अदनान शेख युनूस (29, आगाखान वाडा, भुसावळ), शेख साहील शेख रशीद (21, आगाखावाडा, भुसावळ), अब्दुल नबी हनीफ पटेल (31, शेरा चौक, मास्टर कॉलनी, जळगाव), सनीस नाईन मोहम्मद आसीफ (19,एमआयडीसी एरिया, जळगाव) यांना अटक करण्यात आली.


असे आहे खून प्रकरण ?
शहरातील जाम मोहल्ला चौकातील चहाच्या दुकानात शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता झालेल्या गोळीबारात तेहरीन शेख यांचा मृत्यू झाला. यामुळे त्या भागात एकच खळबळ उडाली. दरम्यान विना क्रमांकाच्या मोटारसायकलने आलेले चारही हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले. या घटनेत सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल आहे. संशयीत खुनानंतर पसार झाल्यानंतर गुन्हे शाखेने बल्लारशहा येथे नातेवाईकांकडे लपून असलेल्या रमीज पटेल या संशयीताला अटक कली.

या संशयीताविरोधात गुन्हा दाखल
शुक्रवारी रात्री उशिरा तेहरीन नासीर शेख याच्या खून प्रकरणी जाकीर मेहबूब खान (43, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरुन संशयीत तनवीर पटेल, अन्वर पटेल, रमीज पटेल, साईल शेख, मजीद पटेल, अदनान उर्फ युनूस यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !