भुसावळातील सारंगधर पाटील यांच्या प्रभागात भाजपा सदस्य नोंदणीस प्रतिसाद
भुसावळ (12 जानेवारी 2025) : भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री फाउंडेशनचे अध्यक्ष सारंगधर पाटील यांच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये नुकतीच भाजपा सदस्य नोंदणी मोहिम राबवण्यात आली. यावेळी अनेकांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी करीत भाजपा विचारधारेत सहभाग नोंदवला.
यांची होती उपस्थिती
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात भाजपातर्फे सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सारंगधर पाटील (छोटू भाऊ), माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, किरण कोलते, प्रशांत नेवे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, भुसावळ भाजयुमो खजिनदार मनिष सारंगधर पाटील, वैभव लोणारी, गौतम जाधव, वेद आहुजा, गौरव वाघ, नरेंद्र यादव, अंकुश वावरे, संदीप वागोडकर, राजेंद्र साळुंके, पवन गुजर, तुषार चंदन, गजानन सुरोसे, सुनील सुरवाडे, रवींद्र आयवले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

