गिरीश महाजन स्पष्टच म्हणाले ; महाविकास आघाडीमध्ये जायला कुणीही तयार नाही !


जळगाव (12 जानेवारी 2025) : मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला, पवार साहेबांच्या जवळ जाऊन बसला, त्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले होते. बाळासाहेबांचे विचार असे होते का? की काँग्रेस सोबत जाऊन बसा. महाविकास आघाडीमध्ये जायला आता कोणीही उत्सुक नाही. त्यांचे नेते सुद्धा वेगळ्या मनस्थितीमध्ये आहेत. असं ते म्हणाले

तुमचा पक्ष संपलेला
मी आधीच बोललो होतो की तुमचा पक्ष संपलेला असेल त्यानुसार आज माझा शब्द तंतोतंत खरा ठरला जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार असल्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं भविष्यामध्ये काय काय होईल ते बघा.आता आश्चर्य वाटण्यासारखं काही राहिलेलं नाही. अनेक जण पक्ष सोडतील. यापुढे महाविकास आघाडी आपल्याला कुठेही दिसणार नाही. इथे कोणी राहायला उत्सुक नाही त्यांचे आमदार उत्सुक नाहीये खासदार उत्सुक नाहीये. नेते दिशाहीन झालेले आहेत.एकेका पक्षांमध्ये चार चार गट आहेत त्यामुळे कोणी काही बोललं की लगेच दुसरा त्याला उत्तर देतो आहे

लवकरच जाहीर होणार पालकमंत्री
राज्यात जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदाचा तिढा महायुतीमध्ये सुटताना दिसत नाहीय. जळगावच्या पालकमंत्री कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले असून गिरीश महाजन यांनी यावर भाष्य केलं. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आमचे अध्यक्ष आहेत. हे सर्व नेते याबद्दल रोज चर्चा करत आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्यासाठी मला असं वाटतं आता फार काही वेळ लागणार नाही असं मंत्री महाजन म्हणाले


कॉपी करू नका.