वाळू वाहतूक करणार्या डंपरच्या धडकेने तीन म्हशींचा मृत्यू
भडगाव (12 जानेवारी 2025) : भडगाव-वाक रस्त्यावर वाळू वाहतूक करणार्या डंपरने धडक दिल्याने तीन म्हशींचा मृत्यू ओढवला तर एका म्हशीला गंभीर दुखापत झाली. याबाबत पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती .
असा घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव शहरातील पेठ भागातील पशुपालक आपल्या म्हशी चारण्यासाठी शेतात घेऊन जात असताना भडगाव-वाक रस्त्यावर जुना महिदंळे रस्त्याच्या विटभट्टी जवळ वाककडुन भडगावकडे येणार्या डंपर (एम. एच. 43 -बीपी 7842) ने म्हशींना जोरदार धडक दिली. यात चार म्हशी पैकी तीन म्हशींचा मृत्यू झाला तर एका म्हशीला गंभीर दुखापत झाली..


धडकेची तीव्रता एवढी जोरदार होती की, चार पैकी तीन म्हशी जागीच मयत होवून डंपरच्या खाली अडकल्या. त्यांना जेसीबीच्या साह्याने डंपर खालून काढावे लागले. घटनेची माहिती मिळताच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी पोलीस दाखल झाले.. याबाबत पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.





