जळगावात दोन कापड विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी


जळगाव (13 जानेवारी 2025) : लोटगाडीवर कपडे घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांवरुन शिविगाळ करत दोन कापड विक्रेत्यांमध्ये हाणामारी झाली. हा प्रकार शनिवार, 11 रोजी दुपारी वर्दळीच्या ठिकाणी कॉग्रेस भवनासमोर घडला. या प्रकरणी दोघांनी परस्पर विरोधात तक्रारी शहर पोलीस ठाण्यात दिल्या.

काय घडले नेमके ?
सतीष चंद्रप्रकाश भैरवानी (31, रा.न्यु.बी.जे.मार्केट) हे टॉवर चौक, काँग्रेस भवनासमोर रेडिमेड कपड्यांची विक्री करतात. शनिवार, 11 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या हातगाडीवर कपडे घेण्यासाठी ग्राहक आले. याचा राग आल्याने अशोक रमेश माळी व अन्य दोघांनी संगनमताने चापट-बुक्क्यांनी मारहाण करत सतीष भैरवानी यांना शिवीगाळ केली. रस्त्यावरील दगड उचलुन मारल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. या प्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल झाला. तपास एएसआय संगीता खांडरे या करीत आहेत.

अशोक रमेश माळी (49, रा.शनिपेठ) हे कपडे विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तेदेखील काँग्रेस भवनासमोर लोटगाडी लावून रेडिमेड कपडे विक्री करतात. शनिवार, 11 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या लोटगाडीवर काही ग्राहक कपडे घेण्यासाठी आले. सतीष भैरवानी यानी आवाज देत ग्राहकांना त्यांच्याकडे बोलविले. याबद्दल अशोक माळी यांनी विचारणा केल्याचा राग आल्याने सतीष भैरवानी सह चौघांनी अशोक व त्यांची बहिण अशा दोघांना चापटा बुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच एकाने काहीतरी वस्तूने महिलेच्या हातावर ओढुन दुखापत केली. या प्रकरणी महिलेसह चौघांवर गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.


कॉपी करू नका.