नाशिक अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत : अपघात रोखण्यासाठी कठोर धोरण : मंत्री गिरीश महाजन


न्यूज नेटवर्क । नाशिक (13 जानेवारी 2025) : राज्यात सातत्याने होणार्‍या अपघातांमध्ये निरपराध नागरिकांचा बळी जात असल्याने वाढते अपघा रोखण्यासाठी आता कडक धोरण आणले जाईलत, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री व ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी केली. शिवाय नाशिक अपघातातील मृत पाचही वारसांच्या कुटूंबाना प्रत्येकी पाच लाखांची मदतीची घोषणा व जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे ते म्हणाले.

नाशिक अपघातात पाच ठार, 13 जखमी
नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवार, 12 रोजी रात्री भीषण अपघात झाला. निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाच्या कार्यक्रमासाठी सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील तरुण गेले होते. या कार्यक्रमावरून परतत असताना उड्डाणपुलावर या मुलांना घेऊन जात असलेला टेम्पो एका उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडकला.या भीषण अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

मृतांना पाच लाखाची मदत
भीषण अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी कल्पतरू खाजगी रुग्णालयात भेट दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदतीची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली. जखमी यांच्यावर उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाईल, असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

अधिकार्‍यांची घेतली बैठक
नाशिक येथे अपघातानंतर मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक घेतली. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नाशिकच्या उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याने ट्रक चालक व सळई भरलेल्या कंपनीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन पोलीस आणि आरटीओ विभागाला आदेश देण्यात आले.


कॉपी करू नका.