भुसावळतील प.क.कोटेचा महाविद्यालयात भूगोल दिनानिमित्त रांगोळी व पोस्टर स्पर्धा


भुसावळ (13 जानेवारी 2025) : श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात सोमवार, 13 जानेवारी रोजी भूगोल विभाग आणि विज्ञान मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

भूगोल दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पोस्टर आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये पोस्टर स्पर्धेचा विषय- सामाजिक आणि पर्यावरणीय समस्या आणि रांगोळी स्पर्धेचा विषय भारतीय संस्कृती होता. पोस्टर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्या, महिला सशक्तिकरण, जागतिक तापमान वाढ, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक वर बंदी, सेवक पृथ्वी, याप्रमाणे आजच्या जगाला संदेश देणारे आणि रांगोळी स्पर्धेमध्ये भारतीय संस्कृतीवर आधारित सुंदर संदेश देणार्‍या रांगोळ्या तयार केल्या. पोस्टर्स स्पर्धेला 23 स्पर्धकांनी भाग नोंदवला.


उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल यांनी केले. डॉ.जे.व्ही.धांडे, भूगोल विभागाचे प्रा.गिरीश सरोदे, स्पोर्ट स्पर्धेचे परीक्षक प्रा.निलेश गुरचल, प्रा.संदीप नेतनराव आणि रांगोळी स्पर्धेचे परीक्षक प्रा.दीपाली पाटील, प्रा.काजल ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !