तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करा : पोलीस निरीक्षक महेश गायकवाड


भुसावळ (13 जानेवारी 2025) : बदलत्या काळात तंत्रज्ञानही मोठ्या प्रमाणावर विकसीत झाले असून आजच्या तरुणाईने तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक बाबींसाठी व योग्यरित्या करावा, असे आवाहन भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी केले. शहिद राकेश शिंदे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमात ते बोलत हातेे.

यावेळी शहिद राकेश शिंदे यांच्या मातोश्री तसेच परिवारातील सदस्य, संस्थेचे प्राचार्य महेंद्र राजपूत, पत्रकार दीपक चांदवानी, शिक्षक वृद व विद्यार्थी उपस्थित होते. निरीक्षक महेश गायकवाड यांनी यावेळी शिस्त आणि वेळेचे महत्त्व सांगत नशा आणि अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचे विद्यार्थ्यांना अवाहन केले. स्वामी विवेकानंदांनी उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. या विचारांवर चालत, तुमच्या स्वप्नांना ध्येयात रूपांतरित करा, असेही निरीक्षक गायकवाड म्हणाले.

प्रास्ताविक प्राचार्य महेंद्र राजपूत यांनी केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात भाग घेतलर. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.


कॉपी करू नका.