महाकुंभात पहिल्या दिवशी दिड कोटी भाविकांचे स्नान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा: हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी


प्रयागराज (13 जानेवारी 2025) : पौष पौर्णिमेनिमित्त युपीतील प्रयागराजमध्ये सोमवारी पहिले शाही स्नान झाले. यावेळी दिड कोटीहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान केले. भाविकांवर यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. 45 दिवस चालणार्‍या या महाकुंभासाठी लाखो भाविक आणि साधू-संतांनी प्रयागराज गाठले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा
महाकुंभच्या शुभारंभानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत कोट्यवधी श्रद्धाळूंना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी म्हटले, प्रयागराज महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. हा महोत्सव श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या संगमाला नवा आयाम देतो. महाकुंभ 2025 ची सुरुवात प्रयागराजमध्ये होत आहे, जी श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमावर असंख्य लोकांना एकत्र आणेल. महाकुंभ हा भारताच्या कालातीत अध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे आणि विश्वास आणि सौहार्दाचा उत्सव आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

45 हजार पोलीस कर्मचारी तैनात.
55 पेक्षा अधिक फोर्स सुरक्षेसाठी कार्यरत
गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 2,750 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

शाही स्नानाच्या तारखा
13 जानेवारी 2025 – पौष पौर्णिमा
14 जानेवारी 2025 – मकर संक्रांत
29 जानेवारी 2025 – मौनी अमावस्या
2 फेब्रुवारी 2025 – वसंत पंचमी
12 फेब्रुवारी 2025 – माघ पौर्णिमा
26 फेब्रुवारी 2025 – महाशिवरात्र

श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि भक्तीचा संगम
प्रयागराजमधील महाकुंभ मेळावा हा भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून, संपूर्ण देशभरातील तसेच परदेशातील भाविकांसाठी मोठ्या श्रद्धेचा सोहळा आहे. या 45 दिवसांच्या अध्यात्मिक पर्वामध्ये विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाकुंभ 2025 : एक नजर
कालावधी : 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी
स्थान : प्रयागराज, उत्तरप्रदेश
उद्देश : श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा प्रसार

 


कॉपी करू नका.