जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : दुचाकी चोरट्यांना बेड्या
Jalgaon MIDC police take major action : Two-wheeler thieves arrested जळगाव (15 जानेवारी 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दीपक दयाराम रूम (34) व दीपक एकनाथ शैले (31, रेणुकानगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सहाजीब हबीब खाटीक (24, मेहरुण. जळगाव) यांची दुचाकी (एम.एच.19 एआर 5347) ही 11 जानेवारी रोजी रात्री घरासमोरून चोरीला गेल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे दोघा आरोपींना अटक केली.


यांनी केली कारवाई
एमआयडीसी निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, गणेश ठाकरे, अफजल बागवान व शनिपेठचे अनिल कांबळे व पराग दुसाने आदींच्या पथकाने केली.





