वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या : न्यायालयाने सुनावली सात दिवसांची एसआयटी कोठडी
Valmik Karad’s problems increase : Court orders seven-day SIT custody बीड (15 जानेवारी 2025) : खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडच्या अडचणी वाढतच असून गुन्ह्याक मकोका लागल्यानंतर आता त्याला सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीने 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची घोषणाबाजी
वाल्मीक कराडला जेलकडे नेत असताना बीड न्यायालयाबाहेर वाल्मीक कराडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कराडला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी वकील हेमा पिंपळे यांनी केली. यावेळी वाल्मीक कराड समर्थक आणि विरोधकांची एकमेकांसमोर घोषणाबाजी केली. पोलिसांनी वाल्मीक कराड समर्थकांना ताब्यात घेतले आहे.

सात दिवसांची कोठडी
वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. मकोका कायद्यांतर्गत ही कोठडी सुनावण्यात आली. या सात दिवसता वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग होता का? यासह विविध बाबींची चौकशी एसआयटी करणार आहे.
