रेल्वेची ऐतिहासीक कामगिरी : एकाच दिवसात टाकले सहा आरएच गर्डर्स
भुसावळ विभागातील भुसावळ-बडनेरा खंडात विक्रमी कामगिरी

Railways’ historic achievement : Six RH girders laid in a single day भुसावळ (16 जानेवारी 2025) : रेल्वे विभागात रेल्वेच्या इतिहासात प्रथमच मंगळवार, 14 जानेवारी रोजी भुसावळ-अकोला खंडात भुसावळ ते अकोला विभागातील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक-10-, पूल क्र. 514/1, आणि पूल क्र. 561/3 (डाऊन आणि अप मार्ग) या ठिकाणी एकाच दिवसात सहा आरएच गर्डर्स टाकून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. यापूर्वी 2 जानेवारी 2025 रोजी भुसावळ ते खंडवा विभागात एकाच दिवशी चार आरएच गर्डर्स टाकण्यात आले होते. हा विक्रम आता मोडीत काढण्यात आला आहे.
कौशल्याने काम पूर्ण
या ऐतीहासिक कामगिरीसाठी 10 पोकलॅन, 11 फरहाना, आणि आठ डंपर तैनात करण्यात आले होते. या प्रचंड यंत्र सामग्रीच्या मदतीने अवघड आणि महत्त्वपूर्ण काम अतिशय कौशल्याने पूर्ण करण्यात आले. या आरएच गर्डर ब्लॉकच्या सावलीत अनेक इतर महत्त्वाची कामेदेखील करण्यात आली. भुसावळ विभागातील या ऐतिहासीक कामगिरीमुळे विभागातील रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम आणि सुरक्षित होणार आहे. ही कामगिरी रेल्वे कर्मचार्यांच्या कौशल्य, टीमवर्क, आणि अचूक नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे.


