सांगवी बुद्रुक गावात वीज चोरी 50 मीटर घेतले ताब्यात


50 meters of electricity stolen in Sangvi Budruk village, taken into custody यावल (17 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात गुरुवारी राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केली आहे, असे संशयीत 50 मीटर तपासणीसाठी काढण्यात आले व आता ग्राहकांना नवीन डिजिटल मीटर जुन्या मीटरच्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे.

धडक कारवाईने उडाली खळबळ
राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्रामीण भागात ही कारवाई सुरू करण्यात आली. लवकरच इतर गावांमध्येदेखील कर्मचार्‍यांच्या वतीने डिजिटल मीटर बसून जुने मीटर काढण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. सांगवी बुद्रुक येथील विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाच्या वतीने सहायक अभियंता आकाश नेहेते, दीपक पाटील, सुरेश मोरे, ऋषिकेश इंगळे, मयूर चौधरी यांच्या नेतृत्वात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली.


सांगवी बुद्रुक गावातील 50 घरांमधील मीटर हे तपासणी कामी काढण्यात आले. मीटरमध्ये छेडछाड झाल्याचा संशय आहे. त्याची वरिष्ठ पातळीवर तपासणी केली जाणार आहे तर आता नागरिकांच्या घरात पूर्वीचे जुने मीटर एवजी नवीन स्मार्ट डिजिटल मीटर लावले जाणार आहेत. ही कारवाई कर्मचारी योगेश बारी, गोविंदा भास्कर, नयना इंगळे, आशा भटकर, महेंद्र महाजन, सागर पाठक या पथकाने राबवली. गावामध्ये कर्मचार्‍यांनी विविध भागात जाऊन ही कारवाई केली व ज्या-ज्या मीटरमध्ये काही तफावत आढळणार आहे. अशा संशयीत मीटरमधील तफावत व संबंधितांनी चोरी केली असल्यास त्यांची तपासणी केली जाणार आहे व वीज युनिटनुसार त्यांना दंडाची नोटीस दिली जाणार असल्याचे विद्युत वितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !