उसमळी गावात शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या संशयावरून 19 वर्षीय तरुणाला मारहाण


यावल (17 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील उसमळी गावात शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या संशयावरून एका 19 वर्षीय तरुणाला दोघांनी शिवीगाळ करीत व दगड मारून दुखापत केली. याप्रकरणी गुरुवारी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

उसमळी येथे आकाश तोताराम बारेला (19) हा तरुण आपल्या घरी असताना रामलाल हरचंद बारेला आणि खुबसिंग शिरताब भिलाला हे दोघे आले आणि शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या रागातून त्याच्याशी वाद घालून त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच दगड मारून दुखापत करण्यात आली. दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !