अकलूदजवळील देशमुख प्लॉट भागात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
यावल (18 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील अकलूद या गावाजवळील देशमुख प्लॉट परिसरात अंदाजे 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.हा प्रकार हा शुक्रवारी निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. फैजपूर पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवत ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
अकलूद, ता.यावल या गावाजवळ शेतशिवारात देशमुख प्लॉट परिसरातून संदीप सुनील महाजन (पिळोदा बुद्रुक) हे ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्यांना रस्त्याच्याकडेला काटेरी झुडपात अनोळखी 45 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने फैतपूर पोलिसांना माहिती दिली. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, उपनिरीक्षक निरज बोकील यांनी या ठिकाणी हवालदार मोती पवार, विकास सोनवणे, विजय परदेशी, गुलबक्ष तडवी यांच्या पथकास पाठवले व त्यांनी पंचनामा करून मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. मयताच्या अंगावर एक जीन्सची पॅन्ट होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटवण्याचे आवाहन फैजपूर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.







