फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉण्टेड आरोपीला पालमधून रावेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मध्यप्रदेशातील सेंधवातील आरोपीवर दोन हजारांचा होता रिवॉर्ड
Raver police shackle a wanted accused in a fraud case from Pal रावेर (18 जानेवारी 2025) मध्यप्रदेशातील सेंधवा पोलीस स्टेशन हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वॉण्टेड असलेल्या आरोपीला पाल येथे रावेर पोलिसांनी बेड्या ठोकत मध्यप्रदेश पोलीसांच्या ताब्यात दिले.
असे आहे प्रकरण
मध्यप्रदेशातील सेंधवा पोलीस स्टेशन जिल्हा बडवाना मधीलअपराध क्रमांक 111/24 मध्ये आरोपी नामे महेंद्र भगवान राठोड हा पाल भागांमध्ये फिरत असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला त्यास पकडून त्याची विचारपूस केली असता सेंधवा पोलीस स्टेशनमधील फसवणुकीच्या गुन्ह्यात पसार असल्याचे त्याने कबुल करताच सेंधवा पोलिसांना सूचित करून त्यास त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीवर दोन हजारांचे रिवॉर्डही ठेवण्यात आले होते.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण, प्रमोद पाटील, महेश मोगरे, महिला पोलीस शिपाई माधुरी सोनवणे यांच्या पथकाने केली.





