जळगावच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटलांची वर्णी : बीडची धूरा अजित पवारांकडे

गिरीश महाजन नाशिकचे तर भंडारा पालकमंत्रीपदी संजय सावकारे


Gulabrao Patil appointed as Guardian Minister of Jalgaon: Ajit Pawar takes charge of Beed मुंबई (18 जानेवारी 2025) : राज्यभरातील पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात अखेर यश आले आहे. उमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

गुलाबरावांची जळगाव पालकमंत्रीपदावर वर्णी
महायुतीकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असतील तर गिरीश महाजन यांची नाशिक जिल्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भंडारा पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.


असे आहेत राज्यभरातील पालकमंत्री
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)- गडचिरोली
एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)- ठाणे, मुंबई शहर
अजित पवार (उपमुख्यमंत्री)- पुणे, बीड
चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर, अमरावती
राधाकृष्ण विखे पाटील- अहिल्यानगर
हसन मुश्रीफ- वाशीम
चंद्रकांत पाटील- सांगली
गिरीश महाजन- नाशिक
गणेश नाईक- पालघर
गुलाबराव पाटील- जळगाव
संजय राठोड- यवतमाळ
आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री)- मुंबई उपनगर
उदय सामंत- रत्नागिरी
जयकुमार रावल- धुळे
पंकजा मुंडे- जालना
अतुल सावे- नांदेड
अशोक उईके- चंद्रपूर
शंभुराज देसाई- सातारा
अदिती तटकरे- रायगड
शिवेंद्रराजे भोसले- लातूर
माणिकराव कोकाटे- नंदूरबार
जयकुमार गोरे- सोलापूर
नरहरी झिरवळ- हिंगोली
संजय सावकारे.- भंडारा
संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर
प्रताप सरनाईक- धाराशिव
मकरंद जाधव- बुलढाणा
नितेश राणे- सिंधुदुर्ग
आकाश फुंडकर- अकोला
बाबासाहेब पाटील- गोंदिया
प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री)- कोल्हापूर
अशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) – गडचिरोली
पंकज भोयर- वर्धा
मेघना बोर्डीकर – परभणी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !