जळगावात ई महासेवा केंद्र फोडले ; 60 हजारांचा मुद्देमाल लंपास
E-Mahaseva center broken into in Jalgaon ; Goods worth Rs 60 thousand looted जळगाव (19 जानेवारी 2025) : शटरची लाकडी कडी तोडुन चोरट्यांनी रोकड लॅपटॉप, प्रिंटर असा सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना सायगाव (ता.चाळीसगाव) येथील ई महासेवा केंद्र शिवसाई आपले सरकार या ठिकाणी घडली. शुक्रवार,17 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
हिलाल सुभाष रोकडे (37, रा.सायगाव) हे ई महासेवा केंद्र चालवितात. नेहमीप्रमाणे गुरुवार, 16 रोजी रात्री 7.30 वाजता त्यांनी केंद्र बंद केले. त्यानंतर चोरट्यांनी या केंद्राला लक्ष्य करत शटरची लाकडी कडी तोडुन केंद्रात प्रवेश केला.
रोख रक्कम 40 हजार रुपये, 15 हजार किंमतीचे लॅपटॉप, पाच हजार किंमतीचे प्रिन्टर असा एकुण 60 हजारांचा मुद्देमाल घेत चोरटे पसार झाले. शुक्रवारी सकाळी हिलाल रोकडे हे केंद्रात आले असता त्यांना चोरीचा प्रकार दिसला. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.घटनास्थळी एपीाय प्रवीण दातरे यांनी धाव घेत माहिती घेतली. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक नंदकिशोर महाजन हे करीत आहेत.