सैफ अली खानवर चाकू हल्ला : ठाण्यातून मुख्य आरोपीला अखेर अटक


Knife attack on Saif Ali Khan : Main accused finally arrested from Thane मुंबई (19 जानेवारी 2025) : सिने अभिनेता सैफ अली खानवर अलीकडेच चाकू हल्ला झाल्यानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. अनेक तासांच्या परिश्रमानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शनिवारी रात्री 2 वाजता ठाण्यातील कामगार छावणीतून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी बांग्लादेशी : चोरीसाठी शिरला बंगल्यात
मुंबई पोलिसांचे डीसीपी गेडाम दीक्षित म्हणाले की, आरोपी चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या घरात घुसला होता. त्याच्याकडे कोणतेही वैध भारतीय कागदपत्रे नाहीत. त्याच्याजवळ सापडलेल्या वस्तूंवरून तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे.

अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याचे वय 30 वर्षे आहे. बेकायदेशीरपणे भारतात आल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विजय दास असे ठेवले. तो 5-6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. इथे एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करायचो. तो पहिल्यांदाच सैफ अली खानच्या अपार्टमेंटमध्ये शिरला.

काय घडले नेमके
15 जानेवारीच्या रात्री आरोपी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात शिरल्यानंतर त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. त्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर, डोक्यावर सहा ठिकाणी वार करण्यात आले. रात्रीच त्यांना
लीलावती रुग्णालयात नेल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा तुकडा अडकल्याने तो शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला.


कॉपी करू नका.