रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणार्‍या 141 दलालांविरूध्द वर्षभरात कारवाई


Action taken against 141 brokers involved in black marketing of railway tickets in a year भुसावळ (20 जानेवारी 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर अवैधरित्या आरक्षण तिकीटे काढून विक्री करणार्‍या 141 दलालांविरूध्द रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या वर्षभराच्या काळात दलालांवर ही कारवाई झाली. यामुळे अवैध दलालांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेल्वे सुरक्षा बलाची धडक मोहिम
रेल्वे सुरक्षा बलातर्फे रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणार्‍यांविरूध्द विशेष मोहिम सुरू केली होती. यात विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी, जवान यांनी तिकीटांचा काळा बाजार करणार्‍या 141 दलालांना अटक करून त्यांच्याकडून तिकीटे जप्त केली. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्थानकावरील अधिकारी, कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. यामुळे अवैध तिकीट दलालांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आरपीएफने संगणक, लॅपटॉप सुध्दा जप्त केले. संपलेल्या 2024 या वर्षात 141 जणांना जेलची हवा खावी लागली.


कॉपी करू नका.