भुसावळातील बियाणी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात
Annual prize distribution ceremony at Biyani School in Bhusawal is a joyous occasion भुसावळ (20 जानेवारी 2025) : शहरातील बियाणी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून के.नारखेडे शाळेचे मुख्याध्यापक युवराज झोपे, बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, विनोद बियाणी, राजेश पारीख, प्रवीण भराडिया, प्रिन्सिपल रुद्रसेन गंठिया उपस्थित होते.
शाळेत झालेल्या भाला फेक, गोळा फेक, थाली फेक, रनिंग, स्लो सायकलिंग रेस अश्या विविध स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता अशा नर्सरी ते बारावीच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांना शिल्ड, मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले. यावेळी डॉ.संगीता बियाणी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळणे गरजेचे असते. खेळांमधून सुद्धा विद्यार्थी हा खूप पुढे जाऊ शकतो. सूत्रसंचालन अलीना खान, प्रगती टेंभुर्णीकर यांनी तर आभार आभार प्रिंसीपल रुद्रसेन गंठीया यांनी मानले.