धुळ्यात वादानंतर तरुणाची हत्या
Youth murdered after argument in Dhule धुळे (21 जानेवारी 2025) : धुळे शहर खुनाने हादरले असून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन खुनात झाले. या घटनेत गौरव माने (24) या तरुणाचा मृत्यू झाला असून तिघा पसार संशयीतांचा शोध सुरू करण्यात आला.
काय घडले नेमके
लीलाबाईची चाळ या ठिकाणी वीज कंपनीत कार्यरत किरण माने व कुटुंबीय राहतात. याच परिसरात राजेंद्र पाकळे व कुटुंबीय राहतात. दोन्ही परस्परांचे नातलग आहे. किरण माने यांचा मुलगा गौरव (24) व पाकळे कुटुंबातील जय व ओम यांच्यात मैत्री असताना त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून सोमवारी वाद झाला व जयने गौरवच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार केला. त्यानंतर संशयित पसार झाले. दुपारच्या वेळी ही घटना घडली. त्यानंतर अत्यवस्थ स्थितीत गौरवला शहरातील साक्री रोडवर असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू ओढवला.
उपअधीक्षक राजकुमार उपासे, शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी दीपक पाटील व पथकाने घटनास्थळ व रुग्णालयात भेट दिली.