भुसावळातील चौघे उपद्रवी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार


 

प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ ः दोघे दोन वर्षांसाठी तर दोघे एक वर्षांसाठी हद्दपार


भुसावळ (21 जानेवारी 2025) ः शहरातील सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तींना आवर घालण्यासाठी पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाया केल्या जात आहेत. गुन्हेगारी आणि उपद्रव थांबविण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय घेत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी चार जणांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहे. त्यात 2 जणांना दोन वर्षासाठी तर दोघांना एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उपद्रवी हद्दपार झाल्याने खळबळ
शहरातील उपद्रवी आणि गुन्हेगारांविरूध्द पोलीस प्रशासनाने मोहिम उघडली आहे. यात शहरातील काही गुन्हेगारी वृत्तीचे व उपद्रवी यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यावर संबंधितांचे म्हणणे ऐकून घेत प्रांताधिकारी पाटील यांनी चार हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय दिला. यात दोघांना दोन वर्षासाठी तर दोघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.

पालिका निवडणुका होणार शांततेत
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. उपद्रवींचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भुसावळ डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रीया पार पाडली.

हे संशयीत झाले हद्दपार
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये अफताब शेख समीउल्लाह (रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याला एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शहरातील गौसिया नगरातील रहिवासी सैय्यद आफताब सैय्यद अरमान उर्फ अप्या याला एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले तर भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंभोरा येथील नशीरशहा जनाबशहा फकीर याला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले तसेच मुस्लीम कॉलनीतील अवलीया मशीदीजवळील रहिवासी शेख मुस्ताक शेख अनवर याला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !