जळगावात चटई कामगाराने उचलले टोकाचे पाऊल
जळगाव (21 जानेवारी 2025) : पत्नी नातेवाईकांना निरोप देण्यासाठी रिक्षा स्टॉपजवळ गेली तर मुलेही घरी नव्हते. घरी एकातंवासात असलेल्या तरुणाने घराबाहेर छताच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवार, 20 रोजी ही घटना 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रेमचंद भगवान पवार (40,रा. साईनगर) असे मृताचे नाव आहे. घरी आल्यानंतर प्रकार दिसताच महिलेने आक्रोश केला.
कारण अस्पष्ट
प्रेमचंद पवार हे एमआयडीसीतील एका चंटई कंपनीत कामाला जावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या दोन मुली आणि मुलगा असे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरी आलेल्या नातेवाईकांना रिक्षास्टॉपपर्यत निरोप देण्यासाठी प्रेमचंद यांच्या पत्नी घराबाहेर पडल्या. त्यावेळी एकातंवासातील पती प्रेमचंद यांनी दोरीने घराबाहेर दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. बेशुध्दावस्थेत त्यांना दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले.