यावलला 24 पासून तीन दिवशीय केळी महोत्सव

केळी प्रक्रिया स्पर्धा व खाद्य पदार्थ, वस्तूंचे प्रदर्शन


यावल (21 जानेवारी 2025) : शहरातील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामी नारायण मंदिरासमोर 24 जानेवारीपासून तीन दिवशीय केळी महोत्सवाचेे आयोजन करण्यात आले आहे. यात केळी प्रक्रिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. केळीपासूनचे विविध खाद्य पदार्थ व वस्तूंचे प्रदर्शन येथे होईल. नैसर्गिक शेतीसह शेतकर्‍यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शहरात भुसावळ रस्त्यावर श्री स्वामी नारायण मंदिरासमोरील प्रांगणात 24 जानेवारी पासुन तीन दिवशीय केळी महोत्सव सुरू होणार आहे.

तीन दिवस चालणार महोत्सव
सतत तीन दिवस हा महोत्सव चालेल व त्याची सांगता 26 जानेवारी रोजी होणार आहे. या महोत्सवात केळी प्रक्रिया संदर्भात शेतकर्‍यांच्या सहभागाने स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तसेच केळीपासूनचे विविध खाद्य पदार्थ व वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमात येणार्‍या शेतकर्‍यांना नैसर्गिक शेती संदर्भात तज्ज्ञाकडून मार्गदर्शन केले जाईल व केळी रोग नियंत्रण, प्रक्रिया उद्दोगची माहिती, प्रचलित उद्योजकांच्या अडचणी, नव उद्योजकांना मार्गदर्शन या कार्यक्रमात केले जाणार आहे.

याकरिता कृषी अधिकारी, केळी संसोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद व पाल येथील संशोधक, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्राम विकास मंडळ, बँक व एम. सी. ई.डी, पी.एम. एफ. एम. ई. संसाधन अधिकारी यांची मार्गदर्शना करीता उपस्थिती लाभणार आहे. या संधीचा लाभ शेतकरी नव उद्योजक यांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक ओवी इंनोव्हेशन अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट फार्मर प्रो. कंपनी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.