जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाकडून धडक तपासणीने खळबळ
Jalgaon Medical College creates a stir with a surprise inspection by the Income Tax Department जळगाव (21 जानेवारी 2025) : नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विद्या रतन किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाल्यानंतर अधिकारी व कर्मचारीवर्गात खळबळ उडाली.
नऊ तास पथकाचा ठिय्या
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांच्या दालनात पथकाने विविध बाबींची चौकशी केली. तब्बल नऊ तास पथकाने ही चौकशी केली. रात्री ात वाजेपर्यंत चाललेल्या या तपासात बांधकाम व्यवहारातील टीडीएस कपात शासकीय नियमांनुसार झाली आहे का ? याबाबत खात्री करण्यात करण्यात आली.
चिंचोली वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम तपासणीच्या कक्षेत
तपासणीदरम्यान चिंचोली येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाशी संबंधित कार्यादेश, खरेदी बिले, शासनाकडून मिळालेला निधी आणि त्याचे नियोजन यावरही अधिकार्यांनी बारकाईने तपास केला. वैद्यकीय बिले, जमा-खर्च यांचा आढावा घेऊन नियमांमध्ये कोणतेही उल्लंघन झाले आहे का, याचा शोध घेण्यात आला.
या कारवाईदरम्यान, महाविद्यालयातील कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, चौकशीत कुठल्याही प्रकारची अनधिकृत किंवा गैरव्यवहार अद्याप तरी समोर आलेला नाही. असे असले तरी शासकीय निधीच्या वापराबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या दृष्टीने आयकर पथक तपास करत आहेत.