बीडमधील खंडणी खुनात आकाचा संबंध स्पष्ट : त्या पोलीस निरीक्षकालाही आरोपी करा : आमदार सुरेस धस
Aka’s connection to the extortion murder in Beed is clear मुंबई (21 जानेवारी 2025) : मी कधीही हवेत आरोप केले नाहीत, आता तर एसआयटीने पुरावे समोर आणल्याने खंडणी, खून या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे हे स्पष्ट झाले आहे. 101 टक्के आका वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, आंधळे हे आरोपी आहेत या व्हिडिओवरून पुष्टी मिळते. या प्रकारात पीआय पाटीलला सहआरोपी केले पाहिजे. ज्यांनी खासदारांबाबत विधान केले होते त्या पोलीस अधिकार्याला पुण्याला पाठवण्याऐवजी गडचिरोली, चंद्रपूरला पाठवलं पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली.
तो मी नव्हेच म्हणणारे सीसीटीव्ही फुटेजमध्ये
माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, निलंबित पाटीलला सहआरोपी केले पाहिजे. तो मी नव्हेच म्हणणारे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मी आहेच हे दिसून आले. मी जे बोललो त्याला पुष्टी मिळाली. अजूनही बरेच आरोपी आहेत. या आरोपींची नावे एसआयटीला देऊ. माझ्याकडे आणखी एक भयानक गोष्ट परळीतून आली. महादेव दत्तात्रय मुंडे, कन्हेरवाडी याचा खून 22 ऑक्टोबर 2023 ला खून झाला. परळी वैद्यनाथ तहसीलसमोर खून झाला. मृतदेह सापडला.
परळीला सानप नावाचे पीआय होते. त्यांनी आरोपींचा छडा लावला परंतु त्यांच्याऐवजी दुसर्याच आरोपीला पकडण्याचं आकाने सांगितले. 2023 पासून महादेव मुंडेंचे आरोपी उघड फिरतायेत. सानप पोलीस अधिकार्यावर दबाव आणला गेला. तो पोलीस अधिकारी बदली घेऊन धाराशिवला गेला असा आरोप त्यांनी केला.