भुसावळ बसस्थानकातील खराब रस्त्याने घेतला वृद्धेचा बळी


Poor road at Bhusawal bus stand claimed the life of an elderly man भुसावळ (22 जानेवारी 2025) : शहरातील बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून डांबरीकरण रखडले असतानाच खराब रस्त्यावर पडल्याने व बसचा धक्का लागल्याने 80 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 21 रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. ललिताबाई चौधरी (80 रा.भडगाव) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

नेमक्या कारणाचा शोध
मंगळवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास 80 वर्षीय ललिताबाई या प्रवासी महिला बसस्थानकात बस पाहात असतांना बसचा मागील भाग लागल्याने जमिनीवर पडलया व तेथेच गतप्राण झाल्या. वाहतूक नियंत्रणक यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले.


घटनास्थळावरून महिलेचा मृतदेह उचलून बसस्थानकात हलवून नंतर शासकीय रुग्णवाहिकेला बोलावून महिलेचा मृतदेह ट्रामा केअर सेंटरला नेण्यात आले. बसस्थानकाच्या आवारात मंगळवारी सकाळी 5.30 वाजता घडलेल्या घटनेबाबत आगार प्रमुख राकेश शिवदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आमच्या बसचा धक्का लागलेला नाही, महिलेस चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !