एक हजारांचे लाच प्रकरण : एरंडोल पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकार्यांची कसून चौकशी
One thousand bribe Case : Thorough investigation of education extension officers of Erandol Panchayat Samiti एरंडोल (22 जानेवारी 2025) : एक हजारांची लाच एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला दोन दिवसांपूर्वी जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले होते तर ज्यांच्यासाठी लाच मागण्यात आली त्या एरंडोल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील यांची जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी व बुधवार, 22 रोजी कसून चौकशी केल्याची माहिती आहे.
लाचखोर मुख्याध्यापक कोठडी
एरंडोल शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील यांनी गेल्या सोमवारी जि.प.शाळेचे इन्स्पेक्शन केल्यानंतर चांगला शेरा लिहावा म्हणून 10 हजार रुपये मागितल्याचे सांगून शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे यांनी प्राथमिक शाळा पिंपळकोठा जि..प.शाळेतील तक्रारदार शिक्षकाकडे एक हजार रुपये लाच मागितली होती तर अन्य शिक्षकांकडून रक्कमही गोळा केली होती. तक्राररदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून सोमवारी शाळेतच मुखयध्यापक बळीराम सोनवणे यांना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता 23 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शिक्षण विस्तार अधिकार्याच्या अडचणी वाढल्या
शिक्षण विस्तार अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केल्यानंतर दोन हजार रुपये मिळाल्याबद्दल विरोध दर्शवला नाही व नंतर कॉल करतो, असे सांगून त्यांनी फोन ठेवला मात्र लाचेत त्यांचाही सहभाग स्पष्ट झाल्याने त्यांना संशयीत आरोपी करण्यात आले व मंगळवारी सायंकाळी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात त्यांची कसून चौकशी करण्यात आली तसेच बुधवारीही पाटील यांना चौकशीकामी बोलावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.