शिकारीचा पाठलाग करताना भोटा शिवारात विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू


कुर्‍हाकाकोडा (23 जानेवारी 2025)  : जवळच असलेल्या भोटा शिवारात विहिरीत पडलयाने बिबट्याच्या मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 22 रोजी भोटा शिवारातील गट क्रमांक 81 मधील तुळशीराम मोरे यांच्या शेतातील विहिरीत घडली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल व कर्मचारी दाखल झाले व त्यांनी मृतावस्थेतील बिबट्याला बाहेर काढत कुर्‍हा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले.

अंदाजे साडेतीन वर्ष वयाच्या बिबट्यावर सहाय्यक वनसंरक्षक यु.एस.बिराजदार, वढोदा वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे, पशू वैद्यकीय अधिकारी मनोज प्रल्हाद पाटील, डॉ.कपावर महेश्वर, कृष्णा रेड्डी, डॉ.प्रशांत लोंढे, मानव वन्यजीव रक्षक विवेक देसाई, ए.एस.मोरे, स्वप्नील गोसावी यांच्या उपस्थितीत दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


तर कदाचित बिबट्या वाचला असता
काही महिन्यांपासून परिसरातील वेगवेगळ्या गावात शेत-शिवारात बिबट्याचा संचार दिसून येत होत असल्याने शेतकर्‍यांसह मजूर वर्ग भयभीत झाले होते. शेती कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी शिवसेनातर्फे वन विभागाला निवेदन देवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनाची दाखल वन विभागाने घेतली असती तर बिबट्या प्राणास मुकले नसता अशी चर्चा परिसरात सुरू आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !