10 हजारांची लाच भोवली : धुळ्यातील नगरभूमापन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


Bribe of Rs 10,000 taken: ACB catches urban surveyor in Dhule धुळे (23 जानेवारी 2025) : चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारताना धुळ्यातील नगरभूमापन अधिकारी भास्कर गंगाराम वाघमोडे (55, सुयोग कॉलनी, जीटीपी स्टॉप, देवपूर, धुळे) यास धुळे एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, परिरक्षण भूमापक हर्षल खोंडे यांनादेखील एसीबीने ताब्यात घेत त्यांची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

असे आहे लाच प्रकरण
62 वर्षीय तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी प्लॉटच्या मूळ मालकाने नगर भूमापन कार्यालय, धुळे येथे अर्ज केला. या अर्जावरून आरोपी वाघमोडे यांनी क्षेत्र दुरुस्ती करण्याचे आदेश काढले. या आदेशावरून मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी 15 व 16 रोजी वाघमोडे याने 20 हजारांची लाच मागितली तसेच त्यातील दहा हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर तक्रार नोंदवताच पडताळणी झाली. वाघमोडे यांनी कार्यालयातील परिरक्षण भूमापक हर्षल खोंडे यांच्यासाठी दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार राजन कदम, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.


कॉपी करू नका.