नांद्रा खुर्द गावात शेकोटीत पडल्याने बाळाचा मृत्यू
Baby dies after falling into fire in Nandra Khurd village जळगाव (23 जानेवारी 2025) : घराबाहेर पेटवलेल्या शेकोटीत खेळताना जावून आठ महिन्यांचा चिमुकला भाजला होता व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.आ ही घटना नांद्रा खु. (ता.जळगाव) येथे घडली. देवांशु सुनील सोनवणे (आठ महिने) असे मृत बाळाचे नाव आहे.
घरासमोर शेकोटी केली होती. खेळता-खेळता हा बाळ अचानक शेकोटीत पडल्याने गंभीररित्या जखमी झाला. त्याचा तत्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. जळीत कक्षामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. सोमवार, 20 रोजी उपचारादरम्यान त्याची प्रकृती गंभीर झाली. उपचाराला प्रतिसाद न देवू शकल्याने या बाळाची सकाळी 5.15 वाजेच्या सुमारास प्राणज्योत मावळली. ही वार्ता कळाल्यानंतर सोनवणे कुटुंबियांना जबर धक्का बसून सदस्यांनी आक्रोश केला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विलास शिंदे हे करीत आहेत.







